पाचव्या दिवशी वडगाव, भारतनगर, जुने बेळगाव परिसरात दौडचे जल्लोषी वातावरणात स्वागत
बेळगाव : दुर्गामाता दौडीच्या पाचव्या दिवशी वडगाव, भारतनगर, जुने बेळगाव परिसरात दौडचे जल्लोषी वातावरणात स्वागत झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, शिवचरित्राचे देखावे आणि पारंपरिक वेश यामुळे शिवभक्तांना साक्षात शिवशाहीची अनुभूती आली. दौडमध्ये हजारो शिवभक्तांचा सहभाग होता. त्यामुळे तरुणाईचा सळसळता उत्साह दौडमध्ये पहायला मिळाला. पाचव्या दिवशीच्या दुर्गामाता दौडला बसवेश्वर चौक खासबाग येथील दुर्गादेवी मातेच्या आरतीने सुरुवात झाली. शशिकांत धामणेकर व रवी जाधव यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. भारतनगर, खासबाग, वडगाव, जुने बेळगाव या भागात दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. वडगाव परिसरात झालेल्या दौडला हजारो धारकऱ्यांची उपस्थिती होती. ठिकठिकाणी स्वागत कमानी तसेच भगवे ध्वज, भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. मंगाई मंदिर येथे दौडची सांगता झाली. तब्बल 13 किलोमीटर शुक्रवारची दौड असतानाही पुरुषांसह महिलांचीही संख्या मोठी होती. मंगाईदेवीच्या आरतीने दौडची सांगता झाली. जगन्नाथ कुलकर्णी व रमेश परदेशी यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.
रांगोळी ठरली लक्षवेधी
शुक्रवारच्या दौडमध्ये पारंपरिक देखाव्यांनी शिवभक्तांचे लक्ष वेधून घेतले. दौडच्या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित तसेच सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले होते. याबरोबरच वडगावचे रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी साकारलेली धर्मवीर संभाजी महाराज यांची रांगोळी लक्षवेधी ठरली.
रविवारची दुर्गामाता दौड
रविवार दि. 28 रोजी शहापूर येथील अंबामाता मंदिरापासून सुरुवात होऊन नाथ पै सर्कल, लक्ष्मी रोड, कारवार गल्ली, लक्ष्मी रोड, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, बनशंकरीनगर, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, मरगम्मा गल्ली, वर्धाप्पा गल्ली, उप्पार गल्ली, संभाजी रोड, धारवाड रोड, जोशी मळा, संभाजी रोड, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, आचार्य गल्ली, विठ्ठलदेव मंदिर, नार्वेकर गल्ली, पी. बी. रोड, होसूर बसवाण गल्ली, बोळमल बोळ, खडेबाजार, महात्मा फुले रोड, रामलिंगवाडी, आनंदवाडी, वडगाव रोड, अळवण गल्ली, खडेबाजार, मेलगे गल्ली, जेड गल्ली, भोज गल्ली, दाणे गल्ली, खडेबाजार, दाणे गल्ली, कोरे गल्ली, बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे सांगता होणार आहे.









