आमदार प्रवीण आर्लेकर यांचे प्रतिपादन
पेडणे : पंच सदस्य उपसरपंच सरपंच जिल्हा सदस्य आमदार हे लोकांचे लोकप्रतिनिधी असतात. आणि त्यांनी लोकांसाठी काम करायचं असते. विकासाला हेवे दावे न करता समांतर विकास करण्याची जबाबदारी प्रत्येक लोकप्रतिनिधीची असते. जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर हे ज्या पद्धतीने विकासाची कामे करत आहेत. तशीच कामे इतर पेडणे तालुक्यातील जे सदस्य आहेत, जिल्हा सदस्य त्यांनीही तशा पद्धतीची कामे करावी. असा सल्ला पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पेठेचावाडा कोरगाव येथील चेकर टाइल्स कामाचा शुभारंभ जिल्हा पंचायत निधीतून एकूण सात लाख ऊपये खर्च करून केला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशांवकर कोरगाव सरपंच समीर भाटलेकर पंच सदस्य लौकिक शेट्यो, पंच सदस्य अनुराधा कोरगावकर ,पंच सदस्य देविदास नागवेकर, श्याम शेट्यो,पंच निता नितीन नर्स,आदी नागरिक उपस्थित होते.
जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले विकासाला चालना देण्यासाठी सरकारचं आणि स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांचं सहकार्य वेळोवेळी मिळत आहे .त्यांच्या सहकार्यातून आज कोरगाव या ठिकाणी चेकर टाईल्स कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. याही पुढे आमदार प्रवीण आर्लेकर यांचे सहकार्य अपेक्षित आहे .जनतेने विकास कोणत्या पद्धतीचा करावा अशी सूचना करावी त्यानुसार विकासाला प्राधान्य देण्यात येईल असे जिल्हा सदस्य रंगनाथ कळशंकर यांनी सांगितले. सरपंच समील भाटलेकर यांनी बोलताना सांगितले आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विकासाचा ध्यास घेतलेला आहे. कोरगाव येथील रखडलेल्या मैदानाच्या कामाचा शुभारंभ केलेला आहे. कोरगाव पंचायत क्षेत्रात अनेक विकासाची कामे झालेली आहे. या ठिकाणी फूटपाथ बसवण्याच्या कामाचाही शुभारंभ केलेला आहे. विकास कामे सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि अशा कामाला आमदार प्रवीण आर्लेकर यांचे शंभर टक्के सहकार्य मिळत असल्याचे सरपंच समील भाटलेकर यांनी सांगितले. श्याम शेट्यो यांनी यावेळी बोलताना सांगितले की जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांच्या सहकार्यातून हे काम होत आहे. सहकार्य मिळत असल्याने गावाच्या विकासासाठी सर्वांनी संघटित होऊन काम करूया आणि आमदार सहकार्य करूया असे आवाहन केले.









