बेळगाव – आज बेळगावात अखिल भारतीय गृहरक्षक व नागरी रक्षक दलाचा ६० वा स्थापना दिवस मोठ्या थाटात पार पडला. इंग्लंडच्या वेल या गावात दुसरा महायुद्धावेळी मिलिटरी वैद्य डॉ. सज्जर्ण चर्चिल यांनी गृहरक्षक व नागरी रक्षक दलाची स्थापना केली. १९४७ साली निष्काम सेवेच्या तत्वावर भारतात देखील याची स्थापना झाली. त्यात बेळगाव येथे पहिली याची स्थापना झाली हि अभिमानाची बाब होय. त्या नंतर धारवाड, कारवार आणि विजापूर येथे होमगार्डने आपली प्रसिद्धी मिळविली. देशात आणीबाणी व अन्य संदर्भात होमगार्डस पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत.
आज बेळगावच्या वंटमुरी कॉलनी श्रीनगर येथील कार्यालयात अखिल भारतीय गृहरक्षक व नागरी रक्षक दलाचा ६० वा स्थापना दिवस पार पडला. या वेळी गृहरक्षक दलाच्या जवानांनी आकर्षक पथसंचलन केले. त्यांनी जेव्हा आग लागते त्यावेळची आपत्काळाची स्थिती कशी हाताळायची याची प्रात्यक्षिक दाखवली.
या वेळी भारतीय गृहरक्षक व नागरी रक्षक दलाचे कमांडंट किरण रुद्र नाईक यांनी मार्गदर्शन केले. होमगार्डची स्थापना आणि कर्नाटकात होमगार्ड पोलीस, एफएसएल, पर्यटनस्थळ, मंदिरे आधी ठिकाणी कशी सेवा बजावत आहेत याची माहिती दिली. लीडरशिप कोर्ससाठी निवड झालेल्या बेळगावच्या होमगार्ड आणि महिला होमगार्ड यांनी सुवर्ण पदक जिंकल्याने अभिमान व्यक्त केला. देशसेवेची इच्छा बाळगणाऱ्यांना लष्करात संधी मिळाली नाही तर ते जवान होमगार्डच्या मार्फत आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे सरकार याकडे लक्ष देऊन होमगार्डसना दिला जाणारा मानधन वाढवण्याची मागणी केली. या नंतर अत्युत्तम सेवा वाजविणाऱ्या गृह रक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला. या वेळी अधिकारी घाळीमठ व इतर अधिकारी उपस्थित होते.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन