जंगल नष्टग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या संशोधनानुसार क्लायमेट समिट सीओपी26मध्ये जी आश्वासने देण्यात आली होती, त्याच्या उलट घडत आहे. मागील वर्षी स्वीत्झर्लंडच्या भूभागाइतके जंगल तोडण्यात आले आहे. 2022 मध्ये दर मिनिटाला 11 फुटबॉल मैदानांसमान जंगल नष्ट झाले आहे. जंगलतोडीमध्ये ब्राझील सर्वात पुढे राहिला आहे. ब्राझील अंतर्गत येणारे अमेझॉनचे जंगल जगाला मिळणाऱ्या एकूण ऑक्सिजनचा सर्वात मोठा हिस्सा देत असते. तर इंडोनेशियात जंगलतोडीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. 2021 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या सीओपी26 हवामान परिषदेत वृक्षतोड रोखणे आणि 2030 पर्यंत अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्यावर सहमती झाली होती. जंगलांशी निगडित या घोषणापत्रावर 100 देशांच्या नेत्यांनी स्वाक्षरी केली होती. 85 टक्के जंगल याच देशांमध्ये सामावलेले आहे. 2014 मध्ये देखील अशाच प्रकारचा करार झाला होता, जो अपयशी ठरला होता. अलिकडेच झालेल्या संशोधनानुसार 2021 मध्ये झालेला करारही अयशस्वी ठरताना दिसून येत आहे.
जागतिक तापमानवाढीचा धोका
संशोधनानुसार जंगल संपुष्टात आल्याने जागतिक तापमानवाढ आणि जैवविविधतेला होणारा धोका वाढत आहे. ब्राझील, कांगो आणि इंडोनेशियातील जंगल मोठा प्रमाणात ग्रीन हाउस गॅसेस शोषून घेत असतात. अशा स्थितीत या देशांमधील वृक्षतोडीमुळे शोषून घेण्यात आलेला कर्बवायू वातावरणात फैलावेल आणि यामुळे तापमान वेगाने वाढणार आहे.
ग्लोबर डीफॉरेस्टेशन 3.6 टक्क्यांनी वाढले
जंगलांवर करण्यात आलेल्या नव्या संशोधनानुसार 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 10 टक्के अधिक जंगल संपुष्टात आले. 4 दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक भागातील वृक्षांना जाळण्यात आले आहे. यामुळे 2.7 गीगाटन कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जित झाला आहे. ही वाढ भारताच्या एकूण लोकसंख्येकडून करण्यात आलेल्या सीओ2 उत्सर्जनाइतकी आहे. तर ग्लोबल डीफॉरेस्टेशन 3.6 टक्क्यांनी वाढले आहे. 1 दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक जंगलतोड ग्लोबल फॉरेस्ट वॉचचे प्रतिनिधी रॉड टेलर यांच्यानुसार 2030 पर्यंत वृक्षांची तोड रोखता येणार नाही. कारण 2022 मध्ये 1 दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील जंगलाची तोड करण्यात आली आहे.









