लक्ष्मी हेब्बाळकरांना विश्वास : कंग्राळी खुर्द येथे प्रचारफेरी
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
राजहंसगडावर भव्य शिवपुतळा उभारून त्यांची तत्त्वे डोळ्यासमोर ठेऊन ग्रामीण मतदारसंघाचा विकास साधला. तसेच कोणताही भाषाभेद न करता ग्रामीण मतदारसंघाचा विकास करून कायापालट केला. याची पोचपावती म्हणून मतदार काँग्रेसला मतदान करून मला भरघोस मतांनी निवडून देतील, असा विश्वास ग्रामीण मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. त्या कंग्राळी खुर्द येथे सोमवारी प्रचारफेरीवेळी शिवाजी चौकामध्ये शिवाजी महाराजांना अभिवादन करताना बोलत होत्या. सोमवारी काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या झंझावाती प्रचाराला ज्योतीनगरपासून सुरुवात झाली. यावेळी चौकाचौकात त्यांचे औक्षण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी या परिसरातील अनेक मंडळांनी त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. त्यानंतर ज्योतीनगरमार्गे प्रचारयात्रा नागनाथ मंदिरपासून हुतात्मा मारुती बेन्नाळकरमार्गे नारायण गल्ली, कलमेश्वर मंदिर, ग्रामपंचायत कार्यालयामार्गे शिवमूर्तीजवळ पदयात्रा आली. यावेळी कुस्तीगिर संघटना अध्यक्ष एम. आर. पाटील, अभियंता मनोज यळ्ळूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. य् ाावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष ज्योती पाटील, सदस्या कमला पाटील, सागर पाटील, मीना मुतगेकर, राधा कांबळे, लता पाटील यांच्यासह अनिल बाळेकुंद्री, मनोहर पाटील, बळाराम पाटील, राहुल पाटील, विशाल भोसले, मोहन पाटील, जी. जी. कंग्राळकर, राजू प्रधान, विनायक राजगोळकर, दुर्गादास, उदय जोगाणी, गजानन गोडसे, विनोद भाटले, तुळसा पाटील, सुधीर पाटील, मोहन कांबळे, अनंत बजंत्री आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता. शिवमूर्तीला अभिवादन केल्यानंतर प्रचारयात्रा आंबेडकर गल्ली, पाटील मळा, रामनगरचा संपूर्ण परिसर, मार्कंडेयनगर परिसरातील कलावती मंदिरमध्ये प्रचारयात्रेची सांगता झाली.









