राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱया ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्यामुळे त्या ग्रामंपचांयतींवर प्रशासक नेमण्यात आले होते. राज्यातील 7 हजार 675 ग्रामपंचायतींमध्ये रत्नागिरी जिह्यातील 222 ग्रामंपचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीद्वारे 18 डिसेंबर रोजी मतदान तर निकाल 20 डिसेंबर रोजी होणार असल्याचे राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आले आहे.
कोरोना काळामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांसह गेल्यावर्षीपासून ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचाही खोळंबा झाला होता. त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलला गेला होता. त्यानंतरही अतिवृष्टीच्या कारणामुळे कोकणातील निवडणुका पुढे गेल्या होत्या. रत्नागिरी जिह्यात 2021-22 व 2022-23 मधील तब्बल 222 ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत संपत आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम पावसाळ्य़ानंतर जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या सर्व ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत व प्रभाग रचना झाली आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱया ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्या होत्या. त्यामुळे त्या ग्रामंपचांयतींवर प्रशासक नेमण्यात आले. राज्यातील 7 हजार 675 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिह्यातील 222 ग्रामंपचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे 3 महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आवश्यक ते नियोजन निवडणूक आयोगाकडून केले जात होते. या निवडणुकांसंबंधीत नोटीस ही 18 नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार जारी करतील. दरम्यान 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी केली.
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणेः
नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.
जिल्हय़ातील तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणेः
तालुका ग्रामपंचायती
मंडणगड 14
दापोली 30
खेड 10
चिपळूण 32
गुहागर 21
संगमेश्वर 36
रत्नागिरी 29
लांजा 19
राजापूर 31









