Uddhav Thackeray vs Eknath Shinde : उध्दव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह काल निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर ठाकरे विरूध्द शिंदे गटात चिन्हासाठी संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही गटाकडून उगवता सूर्य आणि त्रिशूळ चिन्हांवर दावा करण्यात आला आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णया विरोधात उध्दव ठाकरेंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली असून , निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे. याबबात उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता चिन्हासाठी दोन्ही गट आमने-सामने आले आहेत.
दरम्यान, उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हावर दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला आहे. दोघांकडून उगवता सूर्य आणि त्रिशूळाची मागणी करण्यात आली आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या यादीत हे चिन्ह नसल्याने निवडणूक आयोगाकडून उगवता सूर्य आणि त्रिशूळ हे चिन्ह बाद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर ठाकरेंना मशाल आणि शिंदेंना गदा चिन्ह मिळणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र यादीत नसलेले गदा आणि मशालही निकाली लागणार आहे. ठाकरेंपाठोपाठ शिंदेंनाही सारखे चिन्ह हवे आहे. त्य़ामुळे ठाकरे आणि शिंदे यांना कोणते चिन्ह मिळणार, कोणत्य़ा चिन्हावर निवडणूक लढवणार याकडे राजकिय वर्तुळा सोबतच सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.









