मुंबई
गो फर्स्ट या हवाई कंपनीसंदर्भात दिवाळखोरीची बातमी बुधवारी प्रसिद्ध झाली आणि शेअरबाजारात इतर हवाई कंपन्यांचे समभाग मात्र तेजीत असताना दिसून आले. हवाई कंपन्यांचे समभाग जवळपास 8 टक्के इतके शेअरबाजारात तेजी राखून होते. यामध्ये इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो), जेट एअरवेज आणि स्पाईस जेट यांचा समावेश होता. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्याच्या बातमीचाही सकारात्मक परिणाम या कंपन्यांच्या समभागावर जाणवला होता.









