एखाद्याची आई जाणं हे जगातले सगळ्यात मोठं दुःख असतं. पण हे दुःख पोटात घालून देश नावाच्या मातेची सेवा करणं हे माझं परम कर्तव्य आहे. आईने हेच दिलेले माझ्यावरील संस्कार देशाप्रती असणारे प्रेम आहे. आई गेल्यानंतर , काही वेळात आईची अंत्यविधी संपन्न झाल्यानंतर देशासाठी तत्पर असणारे आणि देशाच्या हिताचे विचार करणारे, भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे वयाच्या १०० व्या वर्षी शुक्रवारी दि . ३० डिसेंबर रोजी निधन झाले. मोंदीना आईच्या निधनाचे वृत्त समजताच ते अहमदाबादला रवाना झाले. आईच्या अत्यंसंस्कारानंतर मोदींनी काही वेळ कुटुंबासोबत घालवला आणि अवघ्या दोन तासात त्यांनी आपल्या कार्यास सुरूवात केली. हावडा आणि जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. मन दु:खाने भरून आल्यानंतरही कर्तव्यात मात्र कसूर न ठेवता त्यांनी लगेच कार्याला सुरुवात केली. शंभराव्या वाढदिवसादिवशी आईची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलेली एक गोष्ट कायमस्वरुपी माझ्या लक्षात राहिल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले . अशा भारताला लाभलेल्या कर्तव्यदक्ष मोंदीच्या कामाच्या तत्परतेचे कौतुक सोशल मिडियातून तसेच सर्वसामान्य नागरीकांतून होऊ लागले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र, उपचारावेळी त्यांचे निधन झाले . हीराबेन यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. १८ जून रोजी हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते. हीराबेन मोदी यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमृतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे.पंतप्रधान मोदीं यांचे ३० डिसेंबर रोजी नियोजीत कार्यक्रम होते. अशातच आईच्या मृत्यूनंतर त्यांचे सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द होतील असे गृहीत धरले जात होते. मात्र त्यांनी आईने दिलेले बाळकडू सत्यात उतरवले. मातृशोक उराशी बाळगून काम हीच ईश्वरसेवा मानत आईला कामातून श्रध्दांजली वाहिली.यापूर्वीही अनेकप्रसंगी मोदींनी आपल्या आईबद्दल खूपकाही बोलले आहे. सुरुवातीच्या काळातील आईने केलेले संघर्ष, तिचे मजबूत नीतिमूल्ये या बद्दल बरेच काही शिकण्यासारखे आहे असे सांगत, मोदींनी त्यात असेही म्हंटले आहे कि एकदा आपल्या आईच्या याच गुणांचा आदर करून सन्मान करायचा होता मात्र, आईने तो नाकारला. त्या म्हणाल्या कि, मी स्वतः एक सामान्य मनुष्य असून मी फक्त तुला जन्म दिला आहे. जे तू आज आहेस हे सर्व ईश्वराचा आशीर्वाद आहे. असे आपल्या मातोश्रींच्या वाढदिवसाच्यावेळी मोदींनी आपल्या ब्लॉगवर लिहिले होते.तसेच आईच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहताना,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत हिराबेन यांना शब्दसुमने अर्पण केली. शानदार शताब्दीने ईश्वरचरणी विराम घेतला. आईमध्ये मी नेहमीच त्रिमूर्तीची अनुभुती घेतली आहे. ज्यात तपस्व्याची यात्रा , निष्काम कर्मयोग्याचे प्रतीक आणि मूल्यांप्रती कटिबध्दता या जीवनाचा समावेश होतोय. शंभराव्या वाढदिनी भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलेली एक गोष्ट कायमस्वरुपी माझ्या लक्षात राहिल. काम करो बुध्दी थी, जीवन जिवो सुध्दी थी.याचाच अर्थ (मेंदूचा वापर करून काम करणे आणि शुध्दपणे जीवन व्यतीत करणे होय.)
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन