शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आणण्याचा प्रयत्न, दुर्गमानवड येथे शेतकऱ्यांशी संवाद
राधानगरी/ महेश तिरवडे
राधानगरी तालुक्यातील डोंगर माथ्यावरील कोरडवाहू शेती पाण्याखाली आणणार त्यामुळे शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आणण्याचा आपला प्रयत्न असेल असे प्रतिपादन आम, प्रकाश आबिटकर यांनी केले, ते दुर्गमानवड गैबी ता, राधानगरी येथे धामणी धरणातून शेतीसाठी उपसा सिंचन योजनेच्या कामाबाबत शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात बोलत होते.
यावेळी बोलताना आम, प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत दुर्गमानवड,, तळगाव, पडसाळी,आपटाळ, कात्रेवाडी, डीगेवाडी, पिरळ व इतर वाड्यावस्त्या वरील डोंगरमाथ्यावर ज्या शेतकऱ्यांची शेती आहे, या शेतीमध्ये बाराही महिने पाणी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असून त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त गावांचा सर्व्हे करून व जबाबदारी घेऊन व शेतकऱ्यांच्या सूचना लक्षात घेऊन आराखडा तयार करून पाण्याचे नियोजन करून पुढील वर्षी लवकर काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया, असे सांगितले, यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी उपसा सिंचन योजना माहिती सांगून या योजनेला सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
या संवाद मेळाव्यास प स माजी सदस्य लहू गुरव,उपसा सिंचनचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब आजगेकर,संदीप पाटील, अमरेंद्र मिसाळ, विश्वास राऊत, प्रकाश गुरव, युवराज गुरव, तानाजी पाटील, संतोष पाटील यांच्यासह दुर्गमानवड, तळगाव,पडसाळी, आपटाळ, कात्रेवाडी, डीगेवाडी, मिसाळवाडी,पिरळ, येथील सरपंच, ग्रा प सद्यस , शेतकरी बांधव व ग्रामस्थ या शेतकरी संवाद मेळाव्यास उपस्थित होते