न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथे बोलेरो कार पुलावरुन कोसळून झालेल्या अपघातातील क्लीनर रुपेश पांडुरंग तांबे ( रा. कणकवली ) याचा बांबोळी गोवा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यु झाला.याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मळगाव ते कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो कार वरील ताबा सुटल्याने मळगाव पुलाचा कठडा तोडून कार पुलावरुन थेट खाली कोसळली होती.यात चालकासह क्लीनर गंभीर जखमी झाला होता.जखमी रुपेश पांडुरंग तांबे याच्यावर बांबोळी गोवा रुग्णालयात उपचार सुरु होते.महिन्या भरापूर्वी हा अपघात झाला होता.यातील जखमी याचा मुत्यू झाला.रुग्णालयातून ही माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्याला कळविण्यात आली त्यावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Previous Articleआठ हजार ‘मनरेगा’ कामगारांची मजुरी अनेक महिन्यांपासून थकीत
Next Article अर्भक प्रकरणी संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात









