सावंतवाडी – सालईवाडा येथील रात्रीची घटना ; टेम्पोचे मोठे नुकसान
सावंतवाडी । प्रतिनिधी
चालकाचे नियंत्रण सुटल्याने साईडला असलेल्या संरक्षक भिंतीला ठोकल्याने झालेल्या अपघातात mh 07 4264 टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात काल रात्री साडेबाराच्या दरम्यान येथील सालईवाडा धान्य गोदामाच्या परिसरात घडला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी , टेम्पोचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.









