कोल्हापूर प्रतिनिधी
गुरुवारी सकाळी गोव्याहून मुंबईकडे वाया कराड मार्गे पोलो या खाजगी कंपनीची ट्रॅव्हल्स बस प्रवाशांना घेऊन निघाली होती.यावेळी चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस पुलावरून थेट नदीच्या पात्रात कोसळली. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारणा नदीवरील कोकरूड पुलावरून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
कोकरूड गावच्या नजीक असलेल्या वारणा नदी पुलावरून बस वळण घेत असताना गाडी सरळ वारणा नदीपात्रात घसरली . नदीला पाणी कमी असल्याने ही बस नदीपत्रात कोरड्या भागात जाऊन थांबली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून किरकोळ जखमींना उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे.दरम्यान परिसरातील नागरिकांनी येथे गर्दी केली होती. तर बसचे देखील किरकोळ नुकसान झाले आहे.









