बीएसई सेन्सेक्स 522 तर निफ्टी 159 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील नवीन आठवडा सुरु झाल्यानंतरही घसरणीचा प्रवास मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सलगच्या पाचव्या सत्रात म्हणजे बुधवारीही बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बुधवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 522.82 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 64,049.06 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी हा दिवसअखेर 159.60 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 19,122.15 वर बंद झाला आहे.
बुधवारी विदेशी गुंतवणूकदारांनी विक्री सुरु ठेवली तर देशातील गुंतवणूकदारांनी खरेदी सुरु ठेवली यामुळे याचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला असल्याचे शेअर बाजारातील अभ्यासकांनी यावेळी सांगितले आहे.
सेन्सेक्समध्ये बुधवारी मोठी घसरण नोंदवण्यात आली. यावेळी एनटीपीसी, इन्फोसिस, भारती एअरटेल आणि आयटीसी यांच्या समभागांची मोठी विक्री राहिली. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यात टाटा स्टील, नेस्ले इंडिया, स्टेट बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग मजबूत राहिले आहेत. अदानी एंटरप्राईजेस 2.23, सिप्ला 2.22 आणि अपेलो हॉस्पिटल 2.20 टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहेत. निफ्टीत मिडकॅप 100, बीएसईत स्मॉलकॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक यांच्यातही मोठी विक्री राहिली असून याचा फटका सेन्सेक्स व निफ्टी यांना बसला आहे.
निवडणुकांचा प्रभाव?
डिसेंबर 2023 पर्यंत विधानसभा निवडणुकींचे निकाल समोर येईपर्यंत शेअर बाजारात हे दबाव सत्र सुरु राहणार असल्याचे शेअर बाजारातील तज्ञांनी सांगितले आहे.
अन्य घटनांचे सावट कायम
जागतिक पातळीवरील इस्रायल व हमास यांच्यातील युद्धजन्य स्थितीचा परिणाम, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याजदर वाढीचे संकेत, कच्च्या तेलाची दरवाढ व तिमाही अहवालामधील कंपन्यांची आकडेवारी यांचा सर्व परिणाम हा शेअर बाजारावर होत आहे. यामुळे आगामी काळ हा कसोटीचा राहणार असल्याचेच एकत्रित वातावरण सध्यातरी निर्माण झालेले आहे.









