आंध्रप्रदेश – तिरुपती बालाजी मंदिराचे दरवाजे ६ ते ८ महिने बंद राहण्याची शक्यता आहे. तिरुमल तिरुपती देवस्थानच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर आनंद निलयम नावाची ३७. ८ फूट उंचीची नुपूर आहे. बालाजी भगवानच्या मूळ मंदिराचा दरवाजा थोड्या महिन्यांसाठी बंदच राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्ये हे काम सुरू होणार आहे. या कामामुळे तात्काळ बालाजीची प्रतिकृती बालालयम येथे बसवून भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
Previous Articleआचरा समुद्र किनारी स्वच्छता मोहीम
Next Article विधानभवनाच्या मध्यभागी लागणार बाळासाहेबांचं तैलचित्र









