ग्रामस्थांना मानावा लागतो अजब नयिम
ब्रिटनमधील एका गावात अजब नियम आहे. या गावाला अत्यंत कठोर नियमांचे पालन करणारे गाव मानले जाते. वेंटवर्थ नावाच्या गावाला स्वत:मध्ये बदल घडवून न आणणारे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात अत्यंत अजब नियम असून त्यांचे पालन ग्रामस्थ अत्यंत काटेकोरपणे करतात. गावातील स्थापत्यकला वाचविण्यासाठी आणि येथील परंपरा टिकवून ठेवण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत.
या गावात केवळ एकच दुकान असून दोन पब आणि एक रेस्टॉरंट आहे. येथील लोक कुठल्याही प्रकारे घाईत दिसून येणार नाहीत. गाव अत्यंत सुदर असून येथील लोक बदल पसंत करत नाहीत. वेंटवर्थ गावाला अनेक जण भेट देत असतात. गावात ग्रीन-डोअर पॉलिसीचे पालन केले जाते. म्हणजेच प्रत्येक दरवाजा हिरव्या रंगाचा असतो.

या गावाचे संचालन एक ट्रस्ट (फित्झविलियिम वेंटवर्थ अॅम्नेटी ट्रस्ट) करते आणि हा ट्रस्ट या गावात कुठलाच बदल घडवून आणू इच्छित नाही. पूर्वीप्रमाणेच हे गाव टिकवून ठेवण्याचा या ट्रस्टचा प्रयत्न आहे. गावात 1400 लोकांचे वास्तव्य आहे. 300 हून अधिक वर्षांपासून ट्रस्टकडे क्षेत्रात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. यामुळे मालमत्तांमध्ये ट्रस्टची 95 टक्के मालकी आहे. तर ग्रामस्थ हे प्रत्यक्षात स्वत:च्या घरांचे मालक नाहीत, तर भाडेकरू आहेत. एखाद्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्यास म्हणजेच ब्लडलाइन संपल्यास भाडे वाढविले जाते. घरात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यासाठी लोकांना प्रशासनाची अनुमती घ्यावी लागते. हे गाव एका हेरिटेजचा हिस्सा असल्याचे ग्रामप्रमुख अलेक्झेंडर यांनी सांगितले आहे.









