प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांचा फोन ईन कार्यक्रम शनिवार दि. 22 जुलै रोजी होणार आहे. सकाळी 9 ते 11 यावेळेत नागरिकांना आपले गाऱ्हाणे पोलीसप्रमुखांसमोर फोनवरून मांडता येणार आहे. शनिवारी सकाळी 9 पासून फोन ईन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 0831-2405226 या क्रमांकावर सकाळी 11 पर्यंत जिल्हा पोलीसप्रमुख उपलब्ध असणार आहेत. नागरिकांना आपल्या गावातील व आपल्या परिसरातील समस्या, गुन्हेगारी कारवाया आदींविषयी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्थित वागणूक मिळते का? आपल्या गावात वाहतुकीची समस्या आहे का? मटका, जुगार, बेकायदा दारूविक्री सुरू आहे का? पावसामुळे तुम्ही संकटात आहात का? महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांनाही आपल्या व्यथा मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









