नागरिकांकडून आक्षेप मागविले : जिल्हाधिकाऱयांची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील जिल्हा व तालुका पंचायत मतदारसंघांची संख्या निश्चित करण्यात येत आहे. कर्नाटक पंचायतराज सीमा निर्णय आयोगाने हा निर्णय घेतला असून यासाठी नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरुवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, 2011 च्या जनगणनेनुसार त्या-त्या तालुक्मयातील लोकसंख्या आधारित जिल्हा व तालुका पंचायत मतदारसंघ ठरविण्यात येतात.
जिल्हा पंचायतीसाठी 91, तालुका पंचायतीसाठी 299 मतदारसंघ ठरविण्यात आले आहेत. यरगट्टीसह 15 तालुक्मयांत 299 तालुका पंचायत मतदारसंघ निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 50 हजार लोकसंख्येहून अधिक व 1 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या तालुक्मयात किमान 9 मतदारसंघ असणार आहेत.
1 लाखांहून अधिक 2 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या तालुक्मयांसाठी प्रति 10 हजार लोकसंख्येला 1 याप्रमाणे 11 मतदारसंघ असणार आहेत. कोणत्याही तालुक्मयातील 2 लाख 28 हजारांच्या आतील लोकसंख्येसाठी 20 मतदारसंघ निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 लाखांहून अधिक ग्रामीण लोकसंख्या असणाऱया तालुक्मयांमध्ये 12 हजार लोकसंख्येला 1 मतदारसंघ असणार आहेत.
तालुकानिहाय ग्रामीण लोकसंख्येवर आधारित 15 तालुक्मयांत 91 जिल्हा पंचायत व 299 तालुका पंचायत मतदारसंघ निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात आले असून सात दिवसांच्या आत लेखी तक्रारी नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
तालुकानिहाय जिल्हा पंचायत व तालुका पंचायत मतदारसंघ
तालुका | जिल्हा पंचायत | तालुका पंचायत |
कागवाड | 3 | 9 |
कित्तूर | 3 | 9 |
मुडलगी | 4 | 14 |
निपाणी | 5 | 20 |
बैलहोंगल | 6 | 20 |
रामदुर्ग | 6 | 20 |
खानापूर | 6 | 20 |
गोकाक | 7 | 21 |
चिकोडी | 7 | 22 |
रायबाग | 7 | 23 |
सौंदत्ती | 6 | 20 |
अथणी | 9 | 28 |
हुक्केरी | 9 | 29 |
बेळगाव | 11 | 35 |
यरगट्टी | 2 | 9 |