नवारस्ता/प्रतिनिधी
कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढू लागली आहे परिणामी धरणातील पाणीपातळी नियंत्रीत करण्यासाठी उद्या दि. 20 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 4 फुट 6 इंच उघडून 29900 क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे.
दरम्यान धरण पायथा विद्युत गृहामधून सुरू असलेला 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आणि धरणाच्या सहा वक्र दरवाजा मधून सुरू होणारा 29900 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग मिळून कोयना धरणातून कोयना नदीपात्रात एकूण 32000 क्युसेक्स विसर्ग उद्या शनिवार दिनांक 20 पासून सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा कोयना सिंचन विभागाकडून देण्यात आला आहे.









