आचरा येथे आपत्ती व्यवस्थापन बैठक संपन्न
आचरा प्रतिनिधी
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यावी याबाबत आचरा पोलीस स्टेशन तर्फे आयोजित बैठकीत सुरक्षेसाठी आवश्यक त्या बाबींवर चर्चा करून स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापन फौज निर्माण करण्याचे ठरले.
आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीला जेरोन फर्नांडिस, अनिल करंजे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ शामराव जाधव, परेश सावंत,
अर्जुन बापर्डेकर, उदय बापर्डेकर, मंदार सांबारी, , प्रमोद वाडेकर, पोलीस कर्मचारी अक्षय धेंडे, अभिजीत भाबल, व्यापारी संघटनेचे पंकज आचरेकर, आचरा पोलीसपाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी, त्रिंबक पोलीस पाटील सिताराम सकपाळ, तसेच आचरापोलीस स्टेशन अंतर्गत गावातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब, विद्यूत मंडळ कर्मचारी पिंट्या साळकर, अपराज, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी वर्ग, यासह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी तौक्ते वादळात उद्भवलेल्या परिस्थितीवेळी मदत कार्यात कोणत्या उणीवा जाणवल्या या अनुषंगाने चर्चा करत मदत कार्यासाठी आवश्यक महत्त्वाचे असलेल्या होडी व्यवस्थेबाबत स्थानिक मच्छिमारांचे सहकार्य घेण्याचे ठरले यासाठी आवश्यक साधनसामुग्री तातडीने उपलब्ध होण्यासाठी संभाव्य आपत्ती उद्भवलेल्या भागात व्यवस्था करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली संपर्कासाठी आपत्तीत नेटवर्क प्रॉब्लेम उद्भवत असल्याने याबाबीकडे उपस्थितांमधून सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हटकर यांचे लक्ष वेधले गेले यासाठी संबंधितांशी पोलीसस्टेशन मार्फत पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे सांगितले यावेळी आपत्ती व्यवस्थापनाबाबत आवश्यक ती मदत लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठीव्हाटस अप गृप बनविण्याची संकल्पना सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हटकर यांनी स्पष्ट करून त्यात आवश समावेश केला जाणार असल्याचे सांगितले.