सावंतवाडी प्रतिनिधी
बबन साळगावकर यांनी वेधले मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे लक्ष
सावंतवाडी नगरपालिकेतील दिव्यांग सहाय्यता निधी वितरीत करण्यास विलंब होत आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे लक्ष वेधले आहे सावंतवाडी शहरातील दिव्यांग व्यक्तींना नगरपरिषद बजेटच्या पाच टक्के रक्कम ही वितरित करत असते. यावर्षी दिव्यांग व्यक्तींना निधीअजून मिळालेला नाही . याला बराच विलंब होत आहे. तरी येणाऱ्या दिवाळीच्या अगोदर सदर दिव्यांगांचा हक्काचा निधी वितरित करावा असे त्यांनी म्हटले आहे.









