वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पुरुषांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. कुणीच आत्महत्या करू इच्छित नाही, प्रत्येक प्रकरणामध्ये वेगळी परिस्थिती आहे. पुरुषांसंबंधी कायद्यात कुठलीच व्यवस्थाच नसल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे न्यायलयाने म्हटले आहे.
वकील महेश कुमार तिवारी यांनी ही याचिका दाखल केली होती. विवाहित पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे म्हणत तिवारी यांनी एनसीआरबीच्या आकडेवारीचा दाखला दिला होता. पुरुषांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्यासाठी एक आयोग स्थापन करण्यात यावा अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.









