एसटी आरक्षणावर विधानसभेत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
पणजी : गोवा सरकार राज्यातील आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण देण्याबाबत गंभीर असून या संदर्भात एक शिष्टमंडळ या विधानसभेच्या अधिवेशनानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि कायदा मंत्री यांची भेट घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी सभागृहाला दिले. भाजपचे आमदार गणेश गावकर यांनी सभागृहात मांडलेल्या खासगी सदस्य ठरावावर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. ‘2011 च्या जनगणनेनुसार, गोव्याच्या लोकसंख्येच्या 10.23ज्ञ् अनुसूचित जमाती (एऊ) आहेत. हा समुदाय मुख्य प्रवाहात आणण्यास पात्र आहे, समाजाला अधिक शिक्षित तसेच सशक्त बनविण्यासाठी समर्थनाची आवश्यकता आहे आणि म्हणूनच ते साध्य करण्यासाठी मोठ्या राजकीय प्रतिनिधित्वाची आवश्यकता आहे,’ असे सभागृहाने आज मंजूर केलेल्या ठरावात नमूद केले. लोकसंख्येच्या आधारावर एसटीसाठी विधानसभेच्या 4 जागा राखीव होण्याची शक्यता आहे.









