मुंबई / प्रतिनिधी
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट !
The decision will be made according to the mind of the workers; Commentary of Sharad Pawar!
कार्यकर्त्यांच्या मनासारखा एक दोन दिवसात निर्णय होईल असे भाष्य राज्यसभा खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी केले आहे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये पवार यांची भेट घेतली. तसेच, पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये अशी विनंती केली. त्या अनुषंगाने पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय एक दोन दिवसात होईल असे भाष्य केले आहे त्यामुळे पवारांच्या राजीनामा संदर्भात दोन दिवसात काय घडामोडी घडतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.









