वृत्तसंस्था / त्रिपोली
उत्तर आफ्रिकेतील लिबिया या देशात आलेल्या चक्रीवादळातील मृतांची संख्या आता 5 हजारांहून अधिक झाली आहे. आतापर्यंत 5 हजार 200 मृतदेह हाती लागले असून ही संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत 25 हजारांहून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. डॅनियल नामक चक्रीवादळाने या देशाला तडाखा दिला आहे.









