उद्गयोगविश्वावर शोककळा; विविध क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण
सागर कांबळे : कोल्हापूर
प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पालनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होत. सन 2019 साली सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाच्या प्रमुखपदाची सूत्रे सांभाळली होती.
प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहणे पसंत करणारे सायरस मिस्त्री हे भारतीय उद्योग जगतातील एक मोठे नाव. सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईतील एका पारसी कुंटुंबात झाला. उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचे ते धाकटे सुपुत्र होते. मिस्त्री यांनी मुंबईतील कॅथड्रल ऍण्ड जॉन कॉनन स्कूल येथे प्राथमिक शिक्षण घेतले होते.
वयाच्या 23 व्या वर्षी पालनजी समूहात सक्रिय
मिस्त्री यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी, सन 1991 मध्ये आपल्या कुटुंबाच्या पालनजी समूहासोबत सक्रिय होत त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. 1994 मध्ये शापूरजी पालनजी समूहात संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या कंपनीने भारतात सर्वात उंच निवासी टॉवर बांधणे, सर्वात लांब रेल्वे पूल बांधण्यासह सर्वात मोठे बंदर बांधण्यामध्येही त्यांनी अनेक मोठे विक्रम नोंदवले आहेत.
मिस्त्री यांचा विवाह प्रसिद्ध वकील इक्बाल छागला यांची कन्या रोहिका छागला यांच्याशी विवाह झाला. सायरस मिस्त्री यांना दोन सुपुत्र आहेत. सायरस मिस्त्री यांच्या बहिणीचा विवाह रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नवल टाटा यांच्याशी झाला. त्यामुळे सायरस मिस्त्री हे टाटा कुटुंबीयांशी संबंधित आहेत.
सायरस मिस्त्रीवर हा होता आरोप
परदेशातील नुकसान सोसत असणाऱ्या कंपन्यांना सायरस मिस्त्री यांनी भागिदारी विकल्याचा त्यांच्यावर मोठा आरोप होता. यामुळेच वाद निर्माण झाला आणि त्या दरम्यान मिस्त्री यांना पदावरुन हटवण्यात आले. सायरस मिस्त्री आणि टाटा समुहामधील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता.
मिस्त्री कुटुंबाचा व्यवसाय
भारतीय वंशाच्या सर्वात यशस्वी आणि शक्तिशाली व्यावसायिकांपैकी एक असलेले, पालनजी मिस्त्री यांच्या नेतृत्वात, भारत, पश्चिम आशिया आणि आफ्रिका अशा देशांमध्ये बांधकाम व्यावसायाचे साम्राज्य पसरले. त्यांच्या मुलांसोबत त्यांची टाटा सन्समध्ये 18.5 टक्के हिस्सेदारी आहे.
एक यशस्वी उद्योगपती अशी ओळख
सायरस मिस्त्री यांची ओळख एक यशस्वी उद्योगपती अशी होती. त्यांचा जन्म 4 जुलै 1968 साली झाला होता. 28 डिसेंबर 2012 रोजी त्यांना टाटा समूहाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांना या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते. ते टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष होते. त्यानंतर हा वाद कोर्टातही गेला होता. भारतात आणि इंग्लंडमध्येही सर्वाधिक महत्तवाचे उद्योगपती अशा पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
मिस्त्रीबाबत…
-साधी राहणी
मिस्त्री हे कधीही मी कोणीतरी वेगळा आहे, हे त्यांनी कधीही आपल्या वतर्नातून दाखवून दिले नाही. ते पॅट शर्टसह नेहमी हासतमुख राहणारे मिस्त्री यांचे आगळेवेगळे व्यक्तिमहत्व होते.
-मातीशी नाळ व नम्र स्वभाव
मागील काही दशकांपासून कुटुंबात सधन परिस्थिती असतानाही त्यांनी कधीही संपत्तीचा बेडजाव केला नाही. यामुळे उद्योग जगतात रतन टाटा यांच्या व्यक्तिमहत्वाशी मिळते जुळते वर्तन असल्याने त्यांची नेहमी मातीशी नाळ जोडलेली व आपला स्वभाव नम्र असल्याचे त्याचे दर्शन होत असे.
-कंपनीसोबत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असत.
-तत्कालीन टाटा कंपनीला नॅनो कार व कापड कंपनी बंद करण्याचा दिला होता सल्ला.सायरस मिस्त्री यांची आई भारतीय वंशाची आयरिश नागरिक होती. सायरस मिस्त्री यांच्याकडे आयरिश पासपोर्ट होता.