अत्यावश्यक सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुभा
बेळगाव : सद्यस्थितीत विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी अत्यावश्यक विभागात सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने पोस्टल मतदान करण्याची मुभा दिली आहे. त्यांना 2 मे ते 4 मे पर्यंत मतदान करण्यासाठी अवधी देण्यात आला आहे. संबंधित मतदारसंघांमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान करू शकतात. यासाठी 12 डीआय अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने विद्युत विभाग, बीएसएनएल, रेल्वे, दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ, आरोग्य विभाग, विमानसेवा, बससेवा, अग्निशमन दल, मतदान दिवशी निवडणुकीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार, रहदारी पोलीस, रुग्णवाहिका विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ही पोस्टल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारसंघातील संबंधित कार्यालयात त्यांनी या काळात उपस्थित राहून मतदान करणे महत्त्वाचे आहे. ज्या दिवशी मतदान करणार त्याच दिवशी त्यांना सुटीदेखील दिली जाईल, असे म्हटले आहे. मतदान केल्याचा दिवस वगळून इतर दिवशी कामासाठी त्यांना हजर रहावे लागणार आहे.
मतदारसंघ पोस्टल मतदान केंद्र
- निपाणी तहसीलदार कार्यालय आयबी, निपाणी
- चिकोडी-सदलगा तहसीलदार कार्यालय, खोली क्रमांक 7, चिकोडी
- अथणी तहसीलदार कार्यालय, अथणी
- कागवाड निवडणूक अधिकारी कार्यालय, शिवानंद कॉलेज, कागवाड
- कुडची निवडणूक अधिकारी कार्यालय, खोली क्रमांक 5, तहसीलदार कार्यालय, रायबाग
- रायबाग निवडणूक अधिकारी कार्यालय खोली क्रमांक 6, तहसीलदार कार्यालय, रायबाग
- हुक्केरी तहसीलदार कार्यालय, हुक्केरी
- अरभावी तहसीलदार कार्यालय, मुडलगी
- गोकाक खोली क्रमांक 23, तहसीलदार कार्यालय, गोकाक
- य् ामकनमर्डी सामाजिक कल्याण खात्याचे साहाय्यक निर्देशक कार्यालय, हुक्केरी
- बेळगाव उत्तर महानगरपालिका, सुभाषनगर येथील निवडणूक अधिकारी कार्यालय, बेळगाव
- बेळगाव दक्षिण महानगरपालिका, सुभाषनगर येथील निवडणूक अधिकारी कार्यालय, बेळगाव
- बेळगाव ग्रामीण कंग्राळी खुर्द येथील सरकारी कन्नड शाळा
- खानापूर तहसीलदार कार्यालय, खानापूर
- कित्तूर खोली क्रमांक 14, तहसीलदार कार्यालय, कित्तूर
- बैलहोंगल तहसीलदार कार्यालय, बैलहोंगल
- सौंदत्ती-यल्लम्मा सर्व्हे विभाग, तहसीलदार कार्यालय, सौंदत्ती
- रामदुर्ग खोली क्रमांक 6 तहसीलदार कार्यालय, रामदुर्ग









