फांदी तोडून अनर्थ टाळावा : सामाजिक बांधिलकीची मागणी
जिमखाना मैदान येथील कार पार्किंगच्या ठिकाणी बेळगाव (आंबोली) हायवेच्या बाजूला असलेल्या मोठ्या झाडाची फांदी पूर्णपणे सुकलेली असून वादळी पावसामध्ये तुटून कधीही हायवेवर पडून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अगोदरही सदर झाडाच्या सुकलेल्या फांद्या हायवेच्या मधोमध पडत होत्या . या सर्व परिस्थितीची पाहणी करून याची बांधकाम विभागाने दखल घ्यावी व योग्य ती कार्यवाही करून सदर झाडाची सुकलेली फांदी तात्काळ तोडण्यात यावी व पुढे होणारा अनर्थ टाळावा अशी सामाजिक बांधिलच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे.