आष्टा/वार्ताहर
वाळवा तालुक्यातील गाताडवाडी येथे ६५ वर्षीय वृध्दाचा बेवारस मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत गाताडवाडीचे पोलीस पाटील, विठ्ठल जालिंदर खड्डे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तानाजी ज्ञानू खोत यांच्या शेतात गट क्रमांक १३४ मध्ये बेवारस स्थितीत मृतदेह सापडला. अंदाजे 65 वर्ष पुरुष जातीचा हा मृतदेह असून जांभळ्या रंगाची पॅन्ट परिधान केले आहे. केस व दाढी पिकलेली आहे. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे करण्यात आले. सापडलेला बेवारस मृतदेह शितगृहात ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील अधिक तपास करीत आहेत.
Previous Articleसगळ आधीच ठरलयं, राजकीय भूकंप हे सर्व बकवास- राजू शेट्टी
Next Article उन्हाळ्यात आठवड्यातून कितीवेळा केस धुवावेत?








