वार्ताहर /काकती
काकती येथे घटस्थापनेपासून दौडला मोठ्या उत्साही वातावरणात आरंभ झाला आहे. शुक्रवारी दौडचा मान सिद्धेश्वरनगर, संभाजी गल्लीला देण्यात आला असून सुवासिनीनी आरती ओवाळून शिवभक्तांचे औक्षण केले. प्रेरणामंत्र व शस्त्रपूजन करून पहाटे दौडला सुरुवात झाली. श्री सिद्धेश्वर मंदिराला दौडची प्रदक्षिणा घालून यमनापूर गल्लीमार्गे, देसाई गल्ली, होळी चौक ते होळी गल्लीत दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी दुर्गादेवीच्या मंडपात दौडची सांगता ध्येयमंत्राने करण्यात आली.









