सावंतवाडी : प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHATET रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शनिवारी घोषित करण्यात आले आहे. पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत भरता येतील. ही परीक्षा महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये पहिली ते पाचवी (पेपर १) आणि सहावी ते आठवी (पेपर २) च्या शिक्षकपदांसाठी अनिवार्य आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होतील. अंतिम मुदत ३ ऑक्टोबर आहे. प्रवेशपत्रे १० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान ऑनलाईन उपलब्ध होतील.









