पुणे / प्रतिनिधी :
गेले पाच ते सहा दिवस राज्यभरात झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील धरणसाठय़ात वाढ होत असून, तो 43.51 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी हाच धरणसाठा 70 टक्के इतका होता. दरम्यान, राज्यभर पाऊसधारा सुरूच असून, पुढील चार दिवस कोकण-गोव्यातील अनेक जिल्हय़ात ऑरेंज, तर विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात 24 जुलैच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने राज्यात पुढील आठवडय़ात पुन्हा पावसाची तीव्रता राहण्याचे संकेत आहेत.
यावर्षी पावसाचा खंड राहिल्याने पाणीसाठा, तसेच शेतीवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला आहे. दुबार पेरणी तसेच पिण्याच्या पाण्याचे संकट राज्यासमोर होते. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने राज्याला तारले असून, यामुळे राज्यात पाऊस परतला आहे. सध्या हे क्षेत्र दक्षिणपूर्व विदर्भ व लगतच्या दक्षिण छत्तीसगडच्या भागावर आहे. मध्य प्रदेश व लगतच्या राजस्थानच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती आहे. या सर्व घटकांमुळे देशभर मान्सून सक्रिय असून, सर्वदूर पाऊस होत आहे.
महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे धरणसाठय़ात वाढ झाली आहे. 17 जुलै रोजी उपयुक्त पाणीसाठा 32 टक्के इतका होता. मात्र, पाच ते सहा दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणात पाणीसाठा झाला असून, काही ठिकाणी विसर्गही सुरू आहे. यात नागपूर विभागात 57.62, अमरावती 52.21, औरंगाबाद 26.34, नाशिक 34. 74, पुणे 36.75, कोकण 67.80 टक्के इतका साठा असल्याचे दिसत आहे.
राज्यातील प्रमुख धरणांत असलेला 22 जुलैपर्यंतचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे :
अमरावती विभाग
काटेपूर्णा 38.53, वाण 45.42, अप्पर वर्धा 72.90, नळगंगा 26.14, खडकपूर्णा 1.56, पेनटाकळी 44.88, बेंबळा 64.49, इसापूर 48.02, अरुणावती 44.24, पूस 50.77.
औरंगाबाद विभाग
जायकवाडी 27.72, मांजरा 23.24, माजलगाव 16.22, येलदरी 57.84, सिद्धेश्वर 9.84, निम्न मनार 35.12, निम्न तेरणा 27.60, सिना कोळेगाव 0.
कोकण विभाग
धामणी 60.01, कवडा उ. बंधारा 109.94, तिल्लारी 77.37, निम्न चौंडे 58.34, भातसा 53.03, ऊर्ध्व घाटघर 41.05, तानसा 88.79, मोडकसागर 81.70.
नागपूर विभाग
गोसीखुर्द 36.62, बावनथडी 24.73, असोळामेंढा 100, दिना 101.69, सिरपूर 57.84, इटियाडोह 66.28, पुजारीटोला उ बंधारा 76.73, कालीसरार 64.94, खिडसी 67.13, वडगाव 41.07, नांद 17.64, कामठी खैरी 74.89, निम्न वर्धा 66.92, बोर 50.48,
नाशिक विभाग
निळवंडे 2- 36.12, भंडारदरा 76.72, मुळा 35.81, मुसळवाडी तलाव 35.45, वाघुर 55.69, ऊर्ध्व तापी हतनूर 23.14, कडवा 32.37, वाकी धरण 18.24, अर्जुनसागर 50.07, मुकणे 54.21, भाम धरण 47.38, चणकापूर 28.06, गिरणा 19.68, पालखेड 36.83, वैतरणा 44.54, वाघाड 22.61, भावली 86.86, दारणा 75.82, तिसगाव 0.0, ओझरखेड 25.80, करंजवण 27.82, गंगापूर 47.45, पुणेगाव 26.24.
पुणे विभाग
तुळशी 33.91, राधानगरी 71.77, तिल्लारी 36.40, दुधगंगा 32.95, भामा आसखेड 48.06, डिंभे 32.56, चासकमान 50.76, येडगाव 32.49, घोड 0, पिंपळगाव जोगे 0, माणिकडोह 23.78, वडज 47.06, गुंजवणी 42.90, नीरा देवघर 51.86, भटघर 44.27, पानशेत 50.86, वरसगाव 49.16, खडकवासला 61.29, पवना 47.25, टेमघर 32.61, वारणा 55.41, धोम 41.20, उरमोडी 42.59, तारळी 71.58, धोम बलकवडी 81.92, कन्हेर 36.57, कोयना 37.90, वीर 40.22, उजनी 0 टक्के पाणीसाठा आहे.








