आफ्रिकेतील वोदाब्बे समुदायातील अजब प्रकार
मानवी जीवनात विवाहाला मोठे महत्त्व आहे. परंतु यावरून जगभरात विविध प्रथा-परंपरा आहेत. वेगवेगळ्या जाती, धर्म आणि देशाचे लोक विविध प्रथांसह विवाह करत असतात. आमच्या देशातही विविध ठिकाणी विवाहासंबंधी अनेक प्रथा परंपरा दिसून येतात. परंतु पश्चिम आफ्रिकेतील एका समुदायात विवाहासाठी अत्यंत विचित्र परंपरेचे पालन केले जाते. या समुदायाचे लोक विवाह करण्यासाठी इतरांच्या पत्नींनाच पळवून नेतात. येथील लोक या परंपरेचे पालन दीर्घकाळापासून करत आले आहेत.
पश्चिम आफ्रिकेतील या समुदायाचे नाव वोदाब्बे आहे. या समुदायाचे लोक विवाह करण्यासाठी इतरांच्या पत्नींनाच पळवून नेतात. हा समुदाय अशाप्रकारच्या विवाहासाठीच ओळखला जातो. ही परंपराच या समुदायाची ओळख ठरली आहे.

या समुदायाचे लोक विवाह करण्यासाठी इतरांच्या पत्नीलाच पळवून नेतात. प्रत्यक्षात ही विचित्र परंपरा पहिल्या विवाहासाठी नसते. या समुदायाचे लोक पहिला विवाह घरातील लोकांच्या मर्जीने करत असतात. या समुदायाच्या लोकांमध्ये दुसऱ्या विवाहाची प्रथा काहीशी विचित्र आहे. दुसऱ्या विवाहासाठी अन्य व्यक्तीची पत्नी पसंत पडल्यास ते तिला पळवून नेतात. या प्रथेचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला या समुदायात दुसरा विवाह करण्याची अनुमती नसते. दुसरा विवाह करायचा असल्यास येथील व्यक्तीला हा एकच मार्ग उपलब्ध असतो.
या समुदायाकडून दरवर्षी गेरेवोल महोत्सवाचे आयोजन पेले जाते. या महोत्सवादरम्यान सर्व युवक-युवती नटून-थटून आणि स्वत:च्या चेहऱ्याला रंगवून येत असतात. या सामूहिक आयोजनादरम्यान युवक नृत्य आणि विविध प्रकारच्या कसरतींद्वारे इतरांच्या पत्नींचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतात. यादरम्यान एखाद्याची पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेल्यास समुदायाचे लोक दोघांचाही विवाह लावून देतात. या दुसऱ्या विवाहाला समुदाय प्रेमविवाह म्हणून स्वीकारत असतो.









