जगात अनेक प्रकारच्या प्रथा आहेत, काही अंधश्रद्धेमुळे तर काही धारणांमुळे होत असतात. परंतु काही प्रथा केवळ योगायोगामुळे निर्माण होतात आणि त्या पार पाडणे एका समुदायासाठी उत्सव साजरा करण्याचे किंवा परस्परांसोबत येण्याचे माध्यम ठरते. अमेरिकेतील एका अशाच प्रथेबद्दल चर्चा सुरू आहे.
मिनियापोलिसच्या एका सुंदर भागात लोक दरवर्षी एका अनोख्या प्रथेसाठी एकत्र येतात. ते एका 20 फूट उंच पेन्सिलला शार्प करतात, अलिकडेच ही प्रथा उत्सवासह पार पाडण्यात आली आहे.
कुणाची आहे ही पेन्सिल
ही पेन्सिल एखाद्या समुदायाच्या संपत्तीत नव्हे तर एक दांपत्य जॉन आणि एमी हिगिंस यांच्या घराबाहेर उभी आहे. याला एका विशाल ओकच्या झाडाद्वारे तयार करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी एका वादळाने या झाडाचा वरील हिस्सा तुटला होता. शेजारी यामुळे दु:खी झाले तर काही जण रडले. परंतु हिगिंस दांपत्याने झाडाला नवे जीवन देण्याचा निर्णय घेतला.
कसा आला विचार
वादळानंतर हिगिंस दांपत्याने झाडापासून काही खास निर्माण करण्याचा विचार केला. झाडाच्या खोडाचा आकार पाहता त्यांनी एक विशाल पेन्सिल तयार करण्याचा निर्णय घेतला. याकरता त्यांनी मूर्तिकार कर्टिस इंगवोल्डस्टॅड यांना बोलाविले. कर्टिस यांनी झाडाला ट्रस्टी ब्रँडच्या नंबर 2 पेन्सिलप्रमाणे कोरले आहे.
कशी शार्प केली जाते पेन्सिल
पेन्सिलला शार्प करण्यासाठी एक खास मोठ्या शार्पनरचा वापर केला जातो. याकरता मचाण तयार केली जाते. ही पेन्सिल दरवर्षी थोडी छोटी होत जाते. दरवर्षी 3-10 इंचापर्यंत कापली जाते. दरवर्षी किती कापायची, हे अद्याप ठरलेले नाही. प्रत्येक प्रथेत काहीतरी त्याग करावा लागतो. आम्ही पेन्सिलचा हिस्सा त्यागत आहोत. ही आमच्या प्रेक्षकांसाठी भेट आहे. समुदायाला एकजूट करण्याची इच्छा होती. आम्ही पेन्सिलला शार्प करतो, ही एक नवी सुरुवात आहे. तुम्ही नवे प्रेमपत्र लिहू शकता, धन्यवाद नोट लिहू शकता, गणिताचा प्रश्न सोडवू शकता. ही नवीन काही तरी करण्याची संधी आहे, असे जॉन हिगिंस यांनी म्हटले आहे.
एक मोठा उत्सव
या पेन्सिला शार्प करण्याची प्रथा आता एक मोठा सामूदायिक उत्सव ठरला आहे. ही प्रथा लेक ऑफ द आइल्सच्या भागात होते. शेकडो लोक यात सामील होतात, संगीत अन् इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही लोक पेन्सिल किंवा इरेजरप्रमाणे कपडे परिधानकरून येतात. यंदा दोन स्वीस अल्फहॉर्न वादकांनी लोकांचे मनोरंजन पेले. यजमानांनी मिनियापोलीसचे प्रसिद्ध संगीतकार प्रिन्स यांच्या स्मरणार्थ जांभळ्या रंगाच्या पेन्सिलचे वाटप केले. हा प्रिन्स यांचा 67 जन्मदिन होता.









