केवळ देवासाठीचा नैवैद्य करते फस्त
उत्तर केरळच्या कासरगोड जिल्हय़ात एक छोटेसे परंतु अत्यंत सुंदर गाव आहे अनंतपूर. येथे श्रीहरि विष्णू श्रीअनंतपद्मनाभस्वामी यांच्या स्वरुपात विराजमान आहेत. येथील पीठाला तिरुअनंतपुरम येथील श्रीपद्मनाभस्वामी यांचे मूळ स्थान मानले जाते.
एक छोटेसे तलाव श्रीअनंतपद्मनाभस्वामी मंदिराच्या चहुबाजूला असून एका बाजूने मंदिराच्या आत देवदर्शनासाठी जाण्याचा मार्ग आहे. या तलावानजीकच्या एका जलाशयात मगरीचे वास्तव्य आहे. ही साधारण मगर नसून पूर्णपणे देवाला समर्पित जीव आहे.
भाविक या मगरीला बाबिया या नावाने हाक मारतात. बाबिया भाविकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. बाबिया स्वतःच्या इष्टाबद्दल पूर्णपणे समर्पित आहे आणि दररोज देवाला दाखविण्यात येणारा नैवैद्यच ती ग्रहण करते. स्वतःच्या मांसाहारी स्वरुपाच्या उलट बाबिया पूर्णपणे शाकाहारी आहे.
ही मगर कुठून आली हे आम्हाला माहिती नाही, परंतु ती सुमारे 70 वर्षांपासून मंदिर परिसरात राहत आहे. मंदिर परिसरात मगरीचे वास्तव्य सामान्य असून बाबियाने आजवर कुणालाच नुकसान पोहोचविले नसल्याचे मंदिराचे पुजारी सांगतात.
1945 मध्ये एक इंग्रज अधिकारी एका अज्ञात प्राण्यग्नाकडून मारला गेला होता. तेव्हा इंग्रज अधिकाऱयाने एका मगरीला गोळय़ा घातल्या होत्या, ही मगर तेव्हा मंदिर परिसरात राहत होती. तेव्हापासून बाबिया या परिसरात राहत आहे.
दररोज रात्री अंतिम दर्शन झाल्यावर बाबिया मंदिर परिसरात भटकत असते आणि देवाच्या पवित्र गर्भगृहाबाहेरच निद्रिस्त होते. पहाटे दर्शनाची तयारी सुरू होताच ती पुन्हा तलावाच्या दिशेने जात असते. या कुंडामध्ये एक तरी मगर सदैव असते ही आश्चर्याची बाब आहे. या कुंडामध्ये मगर नेमकी येते कुठून हे कुणीच जाणत नाही. आपण पाहिलेली ही तिसरी मग असल्याचे एका वृद्ध व्यक्तीने म्हटले आहे. एका मगरीचा मृत्यू होताच दुसरी मगर तेथे प्रकट होते. तर नजीकच्या कुठल्याही तलाव किंवा नदीत मगरी आढळून येत नाहीत.









