नवी दिल्ली :
या वर्षी एप्रिलमध्ये देशातील मालाची निर्यात किरकोळ वाढून 34.99 अब्ज डॉलर झाली आहे. मागील वर्षी याच महिन्यात ते 34.62 अब्ज डॉलर होती. बुधवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, आयातही समीक्षाधीन महिन्यात 54.09 अब्ज डॉलर झाली, जी एप्रिल 2023 मध्ये 49.06 अब्ज डॉलर होती.
एप्रिलमध्ये व्यापार तूट म्हणजेच आयात आणि निर्यातीमधील फरक 19.1 अब्ज इतका होता. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी पत्रकारांना सांगितले की, हे आकडे नवीन आर्थिक वर्षाची चांगली सुरुवात दर्शवतात आणि हे पुढेही सुरू राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षी मार्चमध्ये निर्यात 41.68 अब्ज डॉलर होती, जी मागील वर्षी याच महिन्यात 41.96 अब्ज डॉलर होती.









