27 वर्षांमध्ये 5 हजार कार्स चोरल्या ः टॅक्सीचालकांच्या केल्या हत्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी देशातील सर्वात मोठा कार चोरटा अनिल चौहानला अटक केली आहे. अनिल चौहानवर 5 हजार कार्स चोरण्याच आरोप आहे. 52 वर्षीय अनिलने चोरीच्या बळावर दिल्ली, मुंबई आणि ईशान्येत अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. तो आलिशान जीवन जगत होता. अनिलला तीन पत्नी असून 7 मुले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अनिल चौहान हा देशातील सर्वात मोठा कार चोर असल्याचे पोलिसांचा दावा आहे. त्याने 27 वर्षांमध्ये 5 हजारांहून अधिक कार्सची चोरी केली आहे. दिल्लीत त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 6 पिस्तुल अन् काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
दिल्लीत राहत असताना अनिल ऑटोरिक्षा चालविण्याचे काम करायचा. 1995 नंतर त्याने कार चोरण्यास सुरुवात केली. 27 वर्षांमध्ये त्याने सर्वाधिक मारुति 800 मॉडेलच्या कार चोरल्या आहेत. देशातील विविध भागांमधून कार चोरी करत त्यांच नेपाळ, जम्मू-काश्मीर अन् ईशान्येतील राज्यांमध्ये तो विक्री करत होता. चोरीदरम्यान त्याने अनेक टॅक्सीचालकांची हत्या देखील केली आहे. कार चोरीद्वारे त्याने दिल्ली, मुंबई आणि ईशान्येतील राज्यांमध्ये मालमत्ता खरेदी केल्या आहेत. आसाममध्ये आता तो शासकीय कंत्राटदार म्हणून राहत होता. अनिल सध्या शस्त्रास्त्रांच्या तस्करीत सामील होता. उत्तरप्रदेशातून शस्त्रास्त्रs आणत ती ईशान्येतील प्रतिबंधित संघटनांना पुरविल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तर ईडीने त्याच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचाही गुन्हा नोंदविला होता.
अनेकदा झाली होती अटक अनिलला पोलिसांनी अनेकदा अटक केली होती. 2015 मध्ये तो एका काँग्रेस आमदारासह पकडला गेला होता. तेव्हा त्याने 5 वर्षे तुरुंगात काढली होती. 2020 मध्ये तो तुरुंगातून बाहेर पडला होता. त्याच्या विरोधात 180 गुन्हे नोंद आहेत









