27-11-2022ते 3.12.2022
मेष
या आठवडय़ात आरोग्याची हरप्रकारे काळजी घेणे आवश्यक ठरेल. कोणताही निर्णय घेण्यामध्ये द्विधा मनस्थिती होऊ शकते. योग्य काय आणि अयोग्य काय याचा सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत. एखाद्या ज्ये÷ जाणकार स्त्रीकडून योग्य सल्ला मिळेल. आर्थिक बाजू भक्कम असेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो.
पिंपळाला पाणी घाला
वृषभ
तुम्ही इतरांकरता कष्ट कराल, पण त्या लोकांना त्याची जाणीव असेलच असे नाही. आर्थिक बाबतीत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. एखादी जवळची व्यक्ती पैशाची मागणी करून नंतर पाठ फिरवू शकते. या आठवडय़ात कुटुंबातील सदस्यांची एकजूट महत्त्वाची ठरेल. एखादी अवघड काम पूर्ण होऊ शकते. प्रेमप्रसंग सुधारतील.
पक्ष्यांना दाणे घाला
मिथुन
राग आला तरी सध्याची वेळ ही बोलून दाखवण्याची नाही हे लक्षात घ्या. मनाविरुद्ध घटना घडल्या तरी आपला संयम टिकवून ठेवायचा आहे हे ध्यानी असू द्या. आर्थिक आवक सर्वसामान्य असेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढल्यामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. मित्रांच्या सहकार्याने एखादे अवघड काम पूर्ण कराल. तुमच्या मनातील गोष्ट एखाद्या व्यक्ती समोर बोलून दाखवण्याअगोदर विचार करावा.
वडाचे मूळ जवळ ठेवावे
कर्क
तुमच्या भावनाप्रधान स्वभावाला थोडे दूर सारून प्रॅक्टिकली विचार करण्याची गरज आहे. एकाच वेळी अनेक कामे करावी लागल्याने गोंधळ उडण्याची शक्मयता नाकारता येत नाही. येणारा आठवडा हा भविष्यातील अनेक शुभ घटनांचे संकेत देईल. समोरून आलेल्या संधीचा योग्य तो फायदा उचलण्यासाठी आवश्यक ती तयारी करणे गरजेचे ठरेल. आर्थिकदृष्टय़ा हा आठवडा बचत करण्यासाठी उत्तम आहे.
धार्मिक पुस्तकाचे दान करावे
सिंह
कामाच्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. तुमच्यासमोर गोड बोलणाऱयांची कमी नसेल पण तेच लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलू शकतात. हा आठवडा एक प्रकारचा धोका मिळेल असा संकेत देत आहे. आपले काम चोख ठेवले आणि इतरांवर नजर ठेवली तर नुकसान होणार नाही. वैवाहिक जीवन उत्तम असेल.
हॉलमध्ये लाल कपडय़ात नारळ बांधावा.
कन्या
या आठवडय़ात महत्त्वाच्या लोकांची भेट होऊ शकते. या भेटींना संधीमध्ये रूपांतर कसे करता येईल याचा विचार करावा. सरकारी क्षेत्रातल्या किंवा गव्हर्मेंटशी संबंध असलेल्या एखाद्या व्यक्तीची मदत होऊ शकते. प्रेमींना हा काळ अनुकूल आहे. पण पर्सनल स्पेसचा आदर करायला हवा. आर्थिक दृष्टय़ा हा काळ उत्तम असेल. नवीन इन्वेस्टमेंट करताना सुद्धा हा काळ चांगला आहे. वैवाहिक जोडीदाराशी थोडे मतभेद संभवतात.
वस्त्र दान करावे
तूळ
‘देता किती घेशील दो कराने’ याची जाणीव करून देणारा हा आठवडा असणार आहे. या आठवडय़ात तिथे गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. व्यवसायिकांना मनाप्रमाणे आर्थिक आवक प्राप्त होईल. नात्यांच्या बाबतीत मात्र थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद कटाक्षाने टाळावेत. प्रेमींना आनंदाची उधळण करण्याची संधी मिळेल.
हीना अत्तर वापरावे
वृश्चिक
मनात नसताना देखील कित्येक गोष्टी कराव्या लागल्या की थोडी चिडचिड होते. अशीच काहीशी परिस्थिती या आठवडय़ात असण्याची शक्मयता आहे. करारमदार करताना अत्यंत सावधान राहण्याची गरज आहे. एखादी व्यक्ती खोटी आशा दाखवून तुमच्याकडून काम करून घेऊ शकते. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न अवश्य करावा. आर्थिक दृष्टीने हा आठवडा सर्वसामान्य असेल. जुन्या नातेवाईकाची भेट होईल.
पिंपळा खालील माती जवळ ठेवावी
धनु
‘ये बेचारा काम के रोज का मारा’ असे म्हणण्याची पाळी या आठवडय़ात येण्याची शक्मयता आहे. कामाच्या ठिकाणी कामांचा व्याप इतका असेल त्यामुळे घराकडे लक्ष देणे अवघड होऊन बसेल. व्यावसायिकांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. नोकरदार वर्गाने कागदपत्रे गहाळ होऊ नयेत याची काळजी घ्यावी. प्रेमसंबंधात गैरसमजामुळे किंवा पार्टनरच्या वागण्यामुळे दुरावा येण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
कुत्र्यांना चपाती घालावी
मकर
या आठवडय़ात बरेचसे उपहार मिळण्याची शक्मयता आहे. काही नातेवाईक पाहुणे म्हणून घरी येतील. कोणाच्याही खोटय़ा प्रशंसेला बळी पडू नका. कामाच्या ठिकाणी काही कामे पूर्ण करण्यास विलंब होईल. सोबत काम करणाऱया लोकांवरती अति विश्वास टाकू नका. घरात एक छोटेखानी फंक्शन होऊ शकते. वैवाहिक जोडीदाराला मदत करावी लागेल. जाणकार व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडण्याची शक्मयता आहे.
बांधकाम मजुरांना दूध वाटावे
कुंभ
‘जे पेराल ते उगवेल’ हा सृष्टीचा नियम आहे त्याची जाणीव या आठवडय़ात होईल. या अगोदर तुमच्यावर ज्यांनी अन्याय केला त्यांना त्यांच्या कर्माची फळे भोगताना बघण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल. विरोधकांवर कुरघोडी करण्याची संधी तुम्हाला मिळेल. या संधीचा योग्य वापर करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या व्यवहारामुळे लोक प्रभावित होतील. कोणताही निर्णय घेताना भावनेपेक्षा बुद्धीला जास्त महत्व देणे आवश्यक असेल.
अशोकाची सात पाने जवळ ठेवावी
मीन
‘शीर सलामत तो पगडी पचास’ हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. छोटय़ा-मोठय़ा आजारांना वेळेवर उपचार घेतला तर रोखता येईल. या आठवडय़ात संततीविषयी काही निर्णय घ्यावे लागतील. जे सिंगल आहेत त्यांना नवीन नाती सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. स्वतःमध्ये आणि स्वतःच्या कामांमध्ये तुम्ही मग्न राहिलात तर आजूबाजूला काय चालले आहे याची जाणीव तुम्हाला राहणार नाही. काही जुन्या गोष्टी सोडाव्या लागतील. हळदीचा टिळा लावावा
टॅरो उपायः गायीच्या ताज्या शेणाचा दिवा तयार करून त्यात छोटासा गुळाचा खडा टाकावा. मोहरीचे तेल त्यात घालावे. त्या दिव्यात वात घालून दिवा पेटवावा आणि घराच्या मुख्य दारावरून सात वेळेला उतरवून जोडय़ाने विझवावा. याने घरातील अशांतता, कलह, दारिद्रय़ दूर होण्यास मदत मिळते.





