दिनांक 20-11-2022
मेष
मित्रांचा सहवास प्राप्त होईल आणि मित्रांमुळे चांगली मदत देखील मिळू शकते. या आठवडय़ात घरासाठी काही आवश्यक सामान खरेदी कराल. प्रिय व्यक्तीबरोबर बाहेर फिरायला जाऊ शकता. रोमँटिक स्वभावामुळे पार्टनर खुश असेल. या आठवडय़ात कामे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका, नुकसान होऊ शकते. आर्थिकदृष्टय़ा सर्वसामान्य आठवडा असेल. व्यापारीवर्गाला जास्त मेहनत करावी लागेल.
कामाला जाताना सूर्याचे दर्शन घ्यावे.
वृषभ
आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असेल. तुमचा स्वभाव आणि मूड आनंदी होईल. किरकोळ घटना सोडल्यास घरातील वादावादी कमी होईल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. नवीन प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात. पैशांच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. चुकीच्या ठिकाणी केलेली गुंतवणूक नुकसानदायक ठरू शकते. वैवाहिक जीवनात संदेहाला स्थान देऊ नका याने ताणतणाव येऊ शकतो.
पाच काळी मिरीचे दाणे जवळ ठेवावे.
मिथुन
दुसऱयाला मदत अवश्य करावी पण ते करत असताना स्वतःचे नुकसान होऊ नये याची काळजी देखील घ्यावी लागेल. एकाच वेळी अनेक कामे करावी लागल्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी इतरांची मदत घेण्यास काही हरकत नाही. प्रेम संबंधांमध्ये आत्मसन्मान सांभाळावे लागेल. या आठवडय़ात थोडी आर्थिक तंगी जाणवेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
लाल रंगाचा वापर टाळावा.
कर्क
दुसऱयांना दिलेले वचन पाळावे लागेल. या आठवडय़ात काही बाबतीमध्ये संघर्ष जाणवेल. हा संघर्ष आर्थिक किंवा भावनिक स्वरूपाचा असू शकतो. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. छोटय़ा-मोठय़ा आजारांनी त्रस्त होण्याची शक्मयता आहे. कुणाकडे पैसे अडकले असतील तर ते वसूल करण्याकरता योग्य वेळ आहे. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. जितका शक्मय आहे तितका स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा.
फळांचे दान द्यावे.
सिंह
तुमच्या स्वभावामुळे कुटुंबात वाद होऊ शकतात. जितके शक्मय आहे तितके नम्र राहण्याचा प्रयत्न करा. एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन काम हाती घेऊ शकता. भविष्याच्या दृष्टीने हे फायद्याचे ठरेल. त्यावर काम करत असताना टीम वर्क महत्त्वाचे आहे हे विसरू नका. पित्ताचा त्रास होऊ शकतो. कुटुंबातील ज्ये÷ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल. प्रेम संबंध दृढ होतील. छोटय़ा प्रवासाचे प्लॅनिंग कराल.
औदुंबराला पाणी घालावे.
कन्या
कन्फ्युजनचा काळ आहे. नक्की कोणते काम करावे, याचा निर्णय घेणे अवघड जाईल. तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबात एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्याकरता तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. आर्थिक बाबतीमध्ये काळजी करण्याचे कारण नाही. जवळच्या एखाद्या व्यक्तीकडून चांगला सल्ला मिळून फायदा होईल. प्रेम संबंधांमध्ये विश्वास दाखवण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी शब्दांचा योग्य वापर करा.
हिरवा हात रुमाल जवळ ठेवावा.
तूळ
आळस झटकून कामाला लागण्याची गरज आहे. कामांचे नीट नियोजन केल्यास कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करून चालणार नाही. छोटे मोठे आजार नंतर मोठा त्रास देऊ शकतात. आर्थिक बाबतीत समाधानकारक आठवडा असेल. कामाच्या ठिकाणी सोबत काम करणाऱयांबरोबर योग्य तो व्यवहार ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱया वाढल्याने वैवाहिक जीवनात ताणतणाव जाणू शकतो.
हिरवे मूग दान द्यावे.
वृश्चिक
तुमच्या बोलण्याचा लोक चुकीचा अर्थ काढून राग धरू शकतात. या आठवडय़ात एकाच वेळी बरीच कामे करावी लागल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. शक्मयतो इतरांवर अवलंबून राहण्याचे टाळा. आर्थिक बाबतीमध्ये हा आठवडा सर्वसामान्य असेल. एखादी परिचित व्यक्ती किंवा मित्र आर्थिक सहाय्य मागेल जे पूर्ण करणे तुम्हाला जड जाईल. लहान भावंडांची काळजी वाटेल. ज्ये÷ व्यक्तीचे सहकार्य प्राप्त होईल.
लाल फळ दान द्यावे.
धनु
तुमच्या स्वभावाचा आणि इतरांवर असलेल्या विश्वासाचा लोक गैरफायदा घेऊ नयेत याची काळजी घ्यावी लागेल. कामानिमित्त प्रवास आणि प्रवासातून नवीन ओळखी होतील. यातून पुढे जाऊन फायदा होण्याची शक्मयता आहे. या आठवडय़ात थोडे एकाकी वाटू शकते. जितके शक्मय असेल तितके मन मोकळे करण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीचा सल्ला तुमच्या करिअरसाठी उपयुक्त ठरेल.
वाहत्या पाण्यातील एक दगड घरी ठेवावा.
मकर
उत्साह वाढेल अशी एखादी घटना घडेल. या आठवडय़ात आरोग्याच्या छोटय़ा-मोठय़ा तक्रारींना सामोरे जावे लागू शकते. खासकरून अंगदुखी व डोकेदुखी त्रास देईल. जवळच्या व्यक्तींच्या वागण्याचा राग येऊ शकतो. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करावे लागेल. प्रवास करत असताना सावध राहण्याची गरज आहे. कामे पूर्ण करण्याकरता इतरांची मदत घ्यावी लागली तर त्यात गैर काहीच नाही.
गरजूला पांघरूण दान द्यावे.
कुंभ
आपण इतरांचा स्वभाव बदलू शकत नाही पण स्वतःच्या सवयींमध्ये बदल करू शकतो, याची जाणीव करून देणारा आठवडा असेल. आर्थिक ताणतणाव आणि समस्या यांच्यावर मात कराल. यासाठी एखाद्या मित्राची मदत मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कृत्याचा परिणाम तुम्हाला दिसू शकतो. कुटुंबातील व्यक्तींसाठी जास्त कष्ट करावे लागतील. प्रेम संबंधांमध्ये काहीसा निराशेचा सूर असेल. वैवाहिक जोडीदाराचे म्हणणे समजून घ्या.
तीळ दान द्यावे.
मीन
तुमच्या मनात नसताना प्रवास करावा लागू शकतो. अजून थोडा ताण मनावर येईल. गरजा आणि आवड यातील फरक समजून पैसे खर्च करावेत. नाहीतर वायफळ खर्च होईल. कामाच्या ठिकाणी इतर लोक तुमच्या स्वभावाचा फायदा उचलू शकतात. पैशांची येणी वसूल करण्याची गरज आहे. तुम्ही ठरवले तर हातात घेतलेले काम पूर्ण कराल. विद्यार्थी वर्गाला अनुकूल काळ आहे. व्यवसायिकांनी थोडे सबुरीने कामे घ्यावीत.
पिवळा रुमाल जवळ ठेवावा.
टॅरो उपायः तब्येत सुधारण्यासाठी रविवारी सूर्योदयाचे वेळी देशी गाईच्या तुपात थोडे दूध मिसळावे. त्यात वापरात असलेली कोणतीही अंगठी बुडवावी नंतर सूर्याकडे तोंड करून हातात घालावी.









