22 सप्टेंबरला ओटीटीवर झळकणार
प्राइम व्हिडिओने स्वत:चे तीन भाग असणारी जॉन विक प्रीक्वेल सीरिज ‘द कॉन्टिनेंटल’चा ट्रेलर जारी केला आहे. 22 सप्टेंबरपासून प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येणार आहे. कॉलिन वुडेल, मेल गिब्सन, मिशेल प्रादा, बेन रॉबसन, ह्यूबर्ट पॉइंट-डु जर्स, न्हंग केट, जेसिका एलेन, आयोमाइड एडेगन, जेरेमी बॉब आणि पीटर ग्रीन असे कलाकार असणारी ही सीरिज मारेकऱ्यांचा शोध घेणारी कहाणी दर्शविणार आहे. या कहाणीच्या केंद्रबिंदूस्थानी जॉन विक आहे. ही सीरिज प्रेक्षकांना 1970 च्या दशकाची झलक दाखविणार आहे. 22 सप्टेंबर रोजी या सीरिजचा पहिला एपिसोड प्रदर्शित केला जाईल. यानंतर सीरिजचा प्रत्येक एपिसोड दर एक आठवड्याने प्रदर्शित केला जाईल. युवा विन्स्टर स्कॉटच्या नजरेतून ही सीरिज चित्रित करण्यात आली आहे. द कॉन्टिनेंटलची निर्मिती लायन्सगेट टेलिव्हिजनकडून करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमधील कुख्यात हॉटेलच्या प्रारंभिक काळाची लोकांना जाणीव करून दिली जाणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन अल्बर्ट ह्यूजेस आणि चार्लोट ब्रँडस्ट्रॉम यांनी केले आहे. तर कहाणी कूलिज, किर्क वार्ड आणि शॉन सिमन्स यांनी लिहिली आहे.









