प्रतिनिधी/लांजा
लांजा (Lanja) येथील अवघड वळण असलेल्या वेरळ (Veral) घाटात गोव्याहून मुंबईच्या (Goa-Mumbai) दिशेने जाणाऱ्या कंटेनरला 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वा. च्या सुमारास अपघात झाला.
वेरळ घाटातील अवघड वळणावर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि कंटेनरला मोठा अपघात झाला. या अपघातात चालकाने गाडीबाहेर उडी मारल्याने कंटेनर चालक बचावला. या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने काही अंशी वाहतूक कोंडी कमी झाली. सायंकाळी उशिरापर्यंत महामार्गावरुन कंटेनर हटवण्याचे काम सुरू होते.









