काँग्रेसने अखेरीस आम आदमी पक्षाला (आप) केंद्राने आणलेल्या आध्यादेशावर पाठींबा दर्शिवला आहे. बंगळुरमधील भाजपविरोधी प्रमुख पक्षांच्या बैठकीच्य़ा पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला. भाजपने काँगर्सने या आध्यादेशाला पाठींबा न दिल्यास विरोधी ऐक्य़ाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. ‘आप’ने काँग्रेसच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि हा एक सकारात्मक विकास असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली येथील प्रशासनाच्या सेवा नियंत्रणावरील आध्यादेशावर आपली भुमिका स्पष्ट करताना काँग्रेसने म्हटले आहे की, “काँग्रेस दिल्लीतील सेवा नियंत्रणावरील केंद्राच्या अध्यादेशाचे समर्थन करणार नाही. केंद्र सरकार देशाच्या “संघराज्य”या संकल्पनेची तोडफोड करत आहे. भाजपच्या या प्रयत्नांना काँग्रेस नेहमी विरोध करत राहील.
या घडामोडीनंतर मात्र, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ‘आम आदमी पक्षाचा खरपूस समाचार घेतला. ‘आप’ने ज्या पद्धतीने पाटणा बैठकीत दिल्ली अध्यादेशाचा मुद्दा उचलला तो दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “(आप) उद्याच्या बैठकीत सामील होणार आहेत. अध्यादेशाबाबत दिल्लीतील सेवा नियंत्रणाबाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही भाजपचे कधीच या मुद्द्यावर समर्थन करणार नाही. संघराज्याला खिंडार पाडण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना आमचा सातत्याने विरोध आहे. राज्यपालांमार्फत विरोधी राज्ये चालवण्याच्या केंद्र सरकारच्या वृत्तीला आमचा सातत्याने विरोध आहे. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, आम्ही दिल्लीच्या अध्यादेशाला पाठिंबा देणार नाही, ” त्यांनी पीटीआयला सांगितले.