शास्त्राrय पद्धतीने गतिरोधक बसवा : प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : शहरातील वाहतूक व्यवस्था व वाहनांना शिस्त लावण्यासाठी रहदारी पोलिसांची भूमिका मोलाची असते. मात्र मागील दोन-तीन वर्षांतील अपघातांची संख्या पाहता यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. परिणामी याला आवर घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याचा फटका बसतोच आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत गतिरोधकांची अवस्था दयनीय होत असून अशास्त्राrय पद्धतीने घातलेले गतिरोधक अनेकांना त्रासदायक ठरू लागले आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. शहराचा पसारा वाढत आहे, तशी अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. धूम स्टाईलला अडसर म्हणून गतिरोधकांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र सर्वच गतिरोधकांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. याकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, गतिरोधकांची झालेली अवस्था सुधारावी, अशी मागणी नित्याची असली तरी लाखो रुपये गतिरोधकांसाठी खर्च करण्यात आले तरी त्याचा फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे.
आवश्यक ठिकाणी गरज
शहरामध्ये विविध ठिकाणी असलेले अशास्त्राrय पद्धतीचे गतिरोधक तयार करण्यात आल्याने या ठिकाणीही अपघात घडू लागले आहेत. काही ठिकाणी गतिरोधक आवश्यक असताना त्या ठिकाणी गतिरोधक बसविले नाहीत. नको त्या ठिकाणी सरकारी पैसा वाया घालण्यातच धन्यता मानली जात आहे. दरम्यान अपघात घडू लागले आहेत त्या ठिकाणी काळजी घेणे गरजेचे असते. मात्र याकडे पाठ फिरवून आपली जबाबदारी संपली म्हणून हात झटकत असल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येत आहे.
अवजड वाहतूक बंदीकडेही दुर्लक्ष
शहरातील रस्त्यांवरून अवजड वाहतूक बंद करण्याची मागणीही कायमच आहे. मात्र, याकडे कानाडोळा करण्यात आला. अद्यापही या अवजड वाहतूक सुरूच आहे. कॉलेज रोडवर विविध महाविद्यालये व शाळा आहेत. या ठिकाणी गतिरोधक असणे गरजेचे आहे. मात्र असलेले गतिरोधकही काढून टाकले आहेत. यामुळे वाहने जोरात ये-जा करत असतात. यातून अपघात घडू लागले आहेत. तरी अशा ठिकाणी शास्त्राrयपद्धतीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.









