? या उलट या राज्यात काँग्रेसची अवस्था अतिशय दुर्बळ आहे. स्थानिक पातळीवर कोणताही नाव घेण्यासारखा नेता आता या पक्षात राहिलेला नाही. कार्यकर्त्यांचीही वानवा आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचंड पराभव पदरी पडल्याने त्या धक्क्यातून आजही पक्ष बाहेर पडलेला नाही, असे बोलले जाते. आम आदमी पक्षाशी काँग्रेसने युती केली आहे. तथापि, आम आदमी पक्षही येथे दुर्बळ आहे.
? 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चमक दाखविलेली होती. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यावेळी प्रचारात विशेष लक्ष घातले होते. काँग्रेसचा विजय होईल, असे अनेक विश्लेषकांचे मत होते. पण काँग्रेसला 77 जागांपर्यंतच मजल मारता आली आणि पुन्हा भारतीय जनता पक्षालाच बहुमत मिळाले. तेव्हापासून काँग्रेसचा पाया या राज्यात ढासळला आहे, यावर साऱ्यांचे एकमत दिसून येते.
म









