प्रतिनिधी /पणजी
राज्यातील अंगणवाडींची स्थिती खराब झाली असून सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी केली आहे. अनेक ठिकाणी अंगवाडी घरात चालविली जाते, त्यांचे भाडे देण्यासाठी वेळेवर पैसे मिळत नाही अशावेळी सेविका पंचातीत हेलपाटे मारीत असतात. त्यांना वेळेवर पैसे मिळतील अशी तजवीज करा आणि भाडे वाढवून देता येईल काय ते पाहणे अशी मागणी त्यांनी केली आहे.
गोमेकॉ, आरोग्य सेवा, मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था, गोवा दंत महाविद्यालय, अन्न आणि औषध प्रशासन, नगर नियोजन खाते, पालिका प्रशान खाते, महिला आणि बाल विकास तसेच वन खाते या नऊ खात्यांच्या अनुदान मागणीच्या ठरावावर चर्चा करताना आमदार डिलायला लोबो यांनी ठरावाला विरोध करताना त्या बोत होत्या.
गोवा वैद्याकीय महाविद्यालयावर बोलताना त्या म्हणाल्या की गोमेकॉत औषधालय आहे मात्र रुग्णांना औषधे मिळत नाही डॉवटरांनी लिहून दिलेली औषधे खाजगी औषधलयातून आणावी लागतात ती मोठी खर्चीक बाब असून सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होत असतो. त्यामुळे गामेंकॉतील औषधलया मध्ये ऐषधे ऊपलब्ध असतील याची काळजी घ्यावी असेही डिलायला लोबो म्हणाल्या.
परराज्यांतून गोव्यात मासे मोठय़ प्रमाणात येतात ते मासे योग्य आहे की नाही त्याचा तपास होतो का, होत असेल तर कुठे आणि कसा तपास केला जातो ते संबंधीत मंत्र्यांनी स्पष्ट करावे. भाजी फळांवरही औषधांचा वापर केला जातो त्यामुळे गोव्यात येणारी भाजी तसेच फळाची तपासणी होते काय होत असेल तर ती कुठे आणि कशी केली जाते. तपासणी यंत्रे बाजारात उपलबध्द आहे का जेणे करून सर्वसामान्य लोका ते विकत घेउन आपण विकत घेत असलेले मासे किंवा फळे, भाजी तपाणे सोईस्कर असेल. मासळीवर फोर्म्यालीन वापर होत असल्याने तसेच फळे भाजीवर विविध औषधांचा वापर केला जात असल्याने ते हानीकार ठरतात. मात्र समान्य लोकांना औषधांचा वापर झाला की नाही ते कळत नाही.









