विमा क्षेत्रातील मुख्य नेतृत्व शोधण्यास मदत करण्यासाठी अनेक कंपन्यांसोबत चर्चा
मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीजने आता जिओ फायनान्शिअल सर्व्हिस लिमिटेडच्या नवीन विमा व्यवसायासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शोधण्यासाठी जागतिक व देशांतर्गत प्रमुख कंपन्यांसोबत चर्चा सुरु केली आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार रिलायन्स सध्या जीवन, आरोग्य आणि सामान्य विमा क्षेत्रातील मुख्य नेतृत्व शोधण्यास मदत करण्यासाठी अनेक कंपन्यांसोबत चर्चा करत आहे.
प्राप्त अहवालानुसार कॉर्न फेरी आणि स्पेन्सर स्टुअर्ट इंक या कंपन्यांमध्ये तेलापासून दूरसंचार कंपन्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा केली आहे. जिओ फायनान्शिअल पुढील वर्ष सुरु होण्यापूर्वी आपल्या विमा कंपनीसाठी एक सीईओ नियुक्त करण्याचा विचार करणार आहे.
जिओ फायनान्शिअलचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून, ज्येष्ठ बँकर के.व्ही. कामथ या नियुक्त्यांवर बारीक लक्ष ठेवणार आहेत. जिओ फायनान्शिअल विमा व्यवसायासाठी संघटनात्मक बांधणी करण्याच्या प्रक्रियेत आहे.
विमा क्षेत्रात क्रांती घडवेल
रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओ फायनान्शियल भारताच्या विमा क्षेत्रात क्रांती घडवेल, असे म्हटले होते. त्याप्रमाणे या व्यवसायाबाबत कंपनी अधिक गंभीर झाली आहे.









