प्रतिनिधी / बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्ना संदर्भात महाराष्ट्राने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समितीची स्थापन केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर दोन्ही राज्यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार महाराष्ट्राच्या समितीमध्ये कायदा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक, कोल्हापूरचे आय जी, कोल्हापूरचे एसपी, सांगली एस पी यांचा समावेश असणार आहे. बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह अन्य ठिकाणच्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी ही समिती घेणार आहे.