खासबाग भाजी मार्केटमध्ये रविवारपासून इ-टॉयलेट
बेळगाव : खासबाग येथील भाजी मार्केटमध्ये दर रविवारी भाजी विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना पिण्याचे पाणी आणि इ-टॉयलेट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज दिले.
आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज खासबाग परिसराला भेट दिली आणि नगरसेवक रवी साळुंखे यांच्या वार्ड क्र. 27 मधील समस्या जाणून घेतल्या.
यावेळी साळुंखे यांनी, खासबाग मार्केटमध्ये दर रविवारी बाजार भरतो आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी याठिकाणी भाजी विक्री करण्यासाठी येत असतात. मात्र पाणी आणि टॉयलेटची व्यवस्था नसल्यामुळे या भाजी विक्रेत्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे याठिकाणी पाणी आणि इ-टॉयलेट उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी याची दखल घेत येणार्या रविवारपासून पाणी आणिइ-टॉयलेट व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले.
त्याचबरोबर आश्वासन रवी साळुंखे यांच्या वार्डातील इतर समस्याही जाणून घेतल्या.









