पणजी : काल सोमवारी कला अकादमीच्या खुल्या सभागृहाचा भाग कोसळ्याची माहिती मिळताच रेव्होलुशनरी गोवन्सचे सांत आंद्रेतील आमदार विरेश बोरकर यांनी त्या वास्तुस्थळाची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी निकृष्ट दर्जाच्या कार्यामुळे तसेच राज्य सरकारच्या बेजबाबदारपणा मुळे हे घडले असल्याचे त्यांनी म्हटले.पुढे बोलताना बोरकर म्हणाले की, या सभागृहाचे बांधकाम नवीनच असून, यासाठी 55कोटीहून अधिक पैसे वापरण्यात आले आहे. कला अकादमीचे बांधकाम वाढवून वाढवून नेण्याचे काम हे सुरूच आहे. हा एक कमिशन सरकारचा म्हणजेच बीजेपी सरकारचा मोठा घोटाळाच आहे. या घोटाळ्यात कळा आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे तसेच पीडब्लूडी मंत्री निलेश काब्राल तितकेच जबाबदार असून, त्यांना ही वस्तूचे जतन करता आले नसल्याने त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा असेही बोरकर म्हणाले.
आज राज्य सरकारमधील मुख्यमंत्र्यासह इतर मंत्री ह्या घटनेसंबंधी एकमेकावर बोट दाखवून आपली जबाबदारी झटकताना दिसत असून, ते सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. सर्वजण ह्या घोटाळ्यात तितकेच भागीदार असल्याचे बोरकर म्हणाले.आज कला अकादमीच्या बाबतीत घडलेली ही गोष्ट मोठा घोटाळाच असून, जर ह्या सभागृहात कार्यक्रम होता तर या अपघाताला कोण जबाबदार होता. आज राज्य सरकार, मंत्री गोविंद गावडे हे आपली चूक मान्य करत नाही. एकमेकावर बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. खरे तर त्यांनी कंत्राटदारावर अभियांत्यावर सखोल चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करायला पाहिजे होते. परंतु तसे कधीच होत नाही सर्व कमीशनचा खेळ असल्याचे बोरकर म्हणाले.वास्तू कोसळण्याचे हे प्रकरण येत्या अधिवेशनात आपण उंचावून धरणार असून, राज्य सरकारला याबद्द्ल जाल विचारून जो कोणी ह्या घोटाळ्यात सामील आहेत त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोरकर म्हणाले.









