ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. धंगेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा आरोप केला आहे.
धंगेकर म्हणाले, कसब्यात भाजपचा पराभव होणार याची त्यांचा माहिती होती. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी कसब्यात ठाण मांडले होते. दरम्यान, उमेदवार निवडून येणे शक्य नसल्याने कसब्यातील प्रचारानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पैसे वाटले. ज्या घरात पैसे वाटले ते घर माझे होते. पैसे वाटप केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांच्यावरही निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा.
आंदोलन केलं म्हणून माझ्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला. हा अन्याय माझ्यावरचं का? हा पक्षपातीपणा कशासाठी? असा सवालही धंगेकर यांनी उपस्थित केला. तसेच या निवडणुकीत 15 ते 20 हजार मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वासही धंगेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
अधिक वाचा : गणेश बिडकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा; कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप








